वाळवंट आणि समुद्रातून यात्रा

Read story in

वायव्य मेक्सिकोतील बाजा कॅलिफोर्नियाचे मध्यवर्ती वाळवंट जितके अक्षम्य आहे तितकेच सुंदर आहे. स्वप्नासारख्या भूमीवर शतकानुशतके जुन्या निवडुंग वनस्पती (Pachycereus pringlei) आणि बुजम वृक्ष (Fouquieria columnaris) यांचे वर्चस्व आहे, त्यांचे इंग्रजीतील सामान्य नाव लुईस कॅरोलच्या “हंटिंग ऑफ द स्नार्क” या पुस्तकातून योग्यप्रकारे घेतलेले आहे. कडक उन्हाळ्यात तापमान ५० अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढते. हिवाळ्यात सहसा शून्य अंशच्या खाली घसरते आणि वार्षिक १००-३०० मिमी दरम्यान पाऊस पडतो. प्रशांत महासागरातील थंडगार पाणी कॅलिफोर्नियाच्या उष्णकटिबंधीय आखातामध्ये वसला आहे. पाच प्रजातीच्या सागरी कासवांचे घर, प्रशांत महासागरातील खाडीमधील राखाडी देवमासा (Eschrichtius robustus) यासह विविध सागरी सस्तन प्राणी, असंख्य मासे आणि अपृष्ठवंशी प्राण्यांनी समृद्ध आणि विपुल आहे.

कोपऱ्यात स्थित असणाऱ्या या भूप्रदेशात मानवाने सुमारे १२,००० वर्षे वस्ती केली. कोचीमी जमातीचे लोक भटके, कोळी आणि शिकारी होते.  ते ऋतुमानानुसार फिरत असत. त्यांचा प्रवास जमिनीवरील आणि समुद्रातील पाण्याच्या स्रोतामध्ये होत होता. १८व्या शतकात युरोपीय संपर्कानंतर कोचीमी स्थिरावले. दरम्यान उद्भवलेल्या साथीच्या रोगांमुळे आणि दुष्काळामुळे त्यांच्या दोन पिढ्यांमधील लोकसंख्या ९० टक्क्यांनी घटली. पुढील शतकांत कोचीमी लोकांचे वंशज, स्पॅनिश व मेक्सिकन वसाहतकार, त्यानंतर मेक्सिको, युरोप, अमेरिका, चीन आणि जपान या देशांच्या विविध प्रदेशांतून स्थलांतरित झाल्याने एक बहुजातीय समाज निर्माण झाला.  त्यांनी संपूर्ण द्वीपकल्पात लहान, विखुरलेले समुदाय आणि कुरणे स्थापन केली. आजपर्यंत, या एकाकी प्रदेशात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर सुमारे दोन लोकांची आहे, जी जगातील सर्वात कमी आहे.

गेल्या दहा वर्षांपासून मध्यवर्ती वाळवंटात काम करण्याचे भाग्य मला लाभले. अशा लोकांकडून शिकायला मिळाले ज्यामुळे ते केवळ येथे टिकून राहिले नाहीत तर निसर्गाबद्दलचे त्यांचे तपशीलवार ज्ञानामुळे कठोर वातावरणातही  त्यांच जीवन भरभरून गेले.  मी दोन्ही किनाऱ्यावरील तरबेज मासेमाऱ्यासोबत काम केले.  भूतकाळात महासागरांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि ते कसे बदलले आहेत यासाठी होते. जर संशोधन उपलब्ध पर्यावरणीय माहितीच्या संचापुरते मर्यादित असेल तर वैज्ञानिक भूतकाळातील जैवविविधतेच्या किंवा विपुलतेच्या परिमाणाला कमी लेखू शकतात.  या प्रदेशात सामान्यत: ३० वर्षांपेक्षा कमी कालावधीचे असते. ही घटना “शिफ्टिंग बेसलाइन सिंड्रोम” म्हणून ओळखली जाते. समुद्री कासवे आणि विशेषत: हिरव्या कासवांनी (Chelonia mydas) हजारो वर्षांपासून या प्रदेशातील रहिवाशांसाठी अन्न आणि औषध म्हणून मूलभूत भूमिका बजावली आहे. सर्वात जुन्या मच्छीमारांनी आज आपण जे पाहतो त्यापेक्षा खूपच वेगळा समुद्र पाहिला आहे.  काळानुसार हिरव्या कासवांची संख्या, अधिवासात झालेले  बदल आहेत याबद्दलचे त्यांचे ज्ञान वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

डॉन कार्लोस यांनी १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला पॅसिफिक किनाऱ्यावर समुद्री कासवमार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो आणि त्याचे वडील ओजो दे लिबरे सरोवरातील एका निर्जन बेटावर काही आठवडे घालवत असत आणि एका छोट्याशा बोटीतून हिरव्या रंगाची कासवे शोधत असत. हा सरोवरा खोल कालवे आणि विस्तृत उथळपणासाठी ओळखला जातो.  कासव पकडण्यासाठी केवळ वाहतुकीचे नाही तर वारा, प्रवाह आणि भरती-ओहोटीची अचूक परिस्थितीसुद्धा तितकीच आवश्यक आहे. पृष्ठभागावरील पाण्यातील सर्वात लहान लहरींमुळे दृश्यमानतेत अडथळा निर्माण झाला, म्हणून शांत वारे आणि स्थिर पाणी यासह केवळ अष्टमीच्या भरती वेळीच मासेमारी शक्य होती. पकडलेली कोणतीही कासवे खारट केली जात असत आणि त्यांची चरबी तेलात उकळली जात असे. गोड्या पाण्याचा कोणताही स्रोत नसताना, त्यांनी तेलाचे डबे आणि तांब्याच्या नळ्यांपासून समुद्राच्या पाण्याला पिण्यायोग्य केलं.  एलआर्को या जवळच्या खेड्यापर्यंत प्रवास यशस्वी चालेपर्यंत पुरेसे खारट मांस उपलब्ध असायचे. 

ते दीड दिवस गाढव किंवा खेचराने प्रवास करत असत. सोबत सुमारे २० किलो सागरी कासव भरलेले काही महिने न खराब होता टिकू शकत होते आणि एकाकी प्रदेशात किंवा खाणींच्या शहरांत खाण्यासाठी असत. एलआर्कोमध्ये, मांसबीन्स, तांदूळ, कॉफी किंवा गव्हाचे पीठ यासारख्या रेशनच्या बदल्यात कासव विकले जात असे.  त्याकाळी समुद्री कासव पकडण्यावर अनेक घटकांनी बंदी घातली होती.  मूठभर लोकांची वस्ती असणाऱ्या काही शहरातून किंवा कुरणेपुरती कासवांची मागणी मर्यादित होती. मासेमारीसाठी सरोवराचे तपशीलवार ज्ञान, विलक्षण कौशल्य आणि धोक्याचे कोणतेही लहान मोजमाप आवश्यक नव्हते. डॉन कार्लोस आणि त्याचे वडील हे एकमेव मच्छीमार होते जे किमान ५० चौरस सागरी मैल क्षेत्रात काम करत होते.

डॉन इग्नासियो १९५० मध्ये कॅलिफोर्नियाच्या आखातातील मिडरिफ बेटांवर आला. त्याचे कुटुंब तब्बल दोन आठवडे गाढवावरून प्रवास करत होते. एका मरुभूमीपासून किंवा वसंत ऋतूपासून दुस-या भागापर्यंत मासेमारीसाठी योग्य जागा शोधत होते. त्याच्या सुरुवातीच्या काळात दोन – तीन लोकांचा गट तासन्तास किंवा काही दिवस दूरवरच्या मासेमारीच्या छावण्यांमध्ये रांगा लावून जात असत, जिथे ते एकतर कासवांनी आपल्या बोटी भरेपर्यंत किंवा अन्न-पाणी संपेपर्यंत राहत असत.  पथ-निर्देशकाचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे होते. वाऱ्यातील विश्वासघातकी प्रवाह आणि बदल वाचावेत, येणाऱ्या वादळांचा अंदाज बांधणे आणि वाळवंटाच्या किनाऱ्यावरील (निर्जन असले तरी) बंदरांना सुरक्षित करण्यासाठी कामगारांना मार्गदर्शन करणे याचा अर्थ जीवन आणि मृत्यू यांच्यातील फरक असू शकतो. मासेमारी चांगली असताना फेऱ्या कमी वेळाच्या असत. जेव्हा मासेमारी कमी किंवा वारा वादळामुळे जाण पूर्णपणे थांबत होते.  वाळवंटातील किनाऱ्याचे तपशीलवार ज्ञान त्यांना पाणी पुरवठा करण्यास मदत करू शकले. कधीकधी लहान झरे किंवा हंगामी तलावांमधून पुरविले जाते. शिकार करण्याच्या कौशल्यांमुळे अन्नपुरवठा वाढण्यास मदत होऊ शकले. मच्छीमार समुद्री कासवाची चरबी आणि समुद्राच्या पाण्याने चपात्या करत असत. हरिण (Odocoileus hemionus) आणि मेंढी (Ovis canadensis) सारख्या शिकाऱ्यामुळे खारवून खाल्ले जाऊ शकणारे मांस छावणीत दिले जात असे. 

मच्छीमारांनी प्रामुख्याने हिरव्या कासवांना अत्यंत निवडक पद्धतीने पकडले: हार्पूनिंग. समुद्री कासवांचे वर्तन आणि जीवशास्त्र यांच्या काळजीपूर्वक निरीक्षणावर आधारित असलेल्या या कलेला प्रचंड कौशल्याची गरज होती कारण कासवे विकत घेऊन त्यांची जिवंत वाहतूक करावी लागत असे. रात्रीच्या वेळी पाण्याच्या पृष्ठभाग उजळवाण्यासाठी कमानीवर तेलाचा दिवा लावून काम चालत असत. हार्पून बोटवाहकाला दिशा दाखवत असे आणि कासवाचे कवच न फोडता किंवा फुप्फुसांवर आदळल्याशिवाय छिद्र पाडण्यासाठी पुरेशा शक्तीने हार्पून काम करत असे. उन्हाळ्यामध्ये कासवे जेव्हा फिरत असतात आणि पृष्ठभागाजवळ वेळ घालवतात तेव्हा लहान, हलक्या वजनाच्या हार्पूनचा वापर केला जात असे.  हिवाळ्यातील महिन्यांमध्ये जेव्हा कासवे समुद्रतळावर सुप्तावस्थेत असत तेव्हा वजनदार टोकांसह लांब हार्पूनचा वापर केला जात असे.

हिरवी कासवं अमेरिकेच्या सीमेजवळ ८०० किलोमीटर दूर बाजारात पाठवण्यात आली.  परिस्थितीनुसार वाळवंटातील प्रवास दोन दिवस ते दोन आठवडे लागू शकतात.  समुदायासाठी समुद्री कासव हे मुख्य अन्न होते.  एक कासव २० लोकांना खाण्यास सहजपणे पुरत होते. त्याचे मांस खारवून अनेक आठवडे टिकवले जाऊ शकते. काहीही वाया जात नसत.  गाळलेल्या चरबीचा वापर स्वयंपाकासाठी आणि औषध म्हणून केला जात असे. प्राण्याचा प्रत्येक भाग – कवचसुद्धा जो जिलेटीन सुसंगततेसाठी उकळला जाऊ शकतो तोही वापरला जात असे.  छोटी लोकसंख्या, मासेमारीची आणि वाहतुकीची अडचण, बाजारपेठेच्या मर्यादित मागणीमुळे शिकार एका विशिष्ट स्थरावर होती. पण, लवकरच परिस्थिती बदलेल. १९६०पासून अमेरिका-मेक्सिको सीमेवरील शहरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सागरी कासवांच्या मांसाची बाजारपेठेतील मागणी वाढली. विशिष्ट जाळ्यांचा वापर सुरू केल्यामुळे कासवे सहजपणे आणि अधिक संख्येने पकडली जाऊ लागली. वाढत्या अश्वशक्तीच्या जोरावर शक्तिशाली मोटारीमुळे कर्मचाऱ्यांना आणखी वेगाने पुढे जाण्याची मुभा मिळाली आणि वाऱ्यात किंवा जोरदार प्रवाहांमध्ये अडकण्याचा धोका कमी झाला. १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला बांधण्यात आलेल्या या पक्क्या मध्यवर्ती महामार्गामुळे बाजारपेठेच्या केंद्रांकडे जाणारा प्रवास दिवसागणिक कमी झाला. बाजारपेठेतील मागणी, बाजारपेठेतील प्रवेश आणि सुधारित मासेमारी तंत्रज्ञान या ‘परिपूर्ण वादळा’मुळे मोठ्या प्रमाणावर कासवांची पकड झाली आणि त्यामुळे दोन दशकांत त्यांची संख्या जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आली.

हिरव्या कासवांच्या मागील लोकसंख्येचा अंदाज लावण्यासाठी मच्छिमारांबरोबर काम करून आणि त्यांना पर्यावरणीय आकडेवारीशी समाकलित करून, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या प्रदेशातील ७०वर्षांहून अधिक हिरव्या कासवांच्या संख्येच्या स्थितीची पुनर्रचना केली आहे.  निश्चितच एक चांगली बातमी आहे. ४०वर्षांपेक्षा जास्त काळ संरक्षणाच्या प्रयत्नांनंतर कासवांची संख्या वाढत आहे (दक्षिण मेक्सिकोमधील समुद्रकिनारे १९८०पासून संरक्षित केले गेले आहेत आणि १९९०पासून मेक्सिकोमधील समुद्री कासव पकडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे). तथापि, संख्या ऐतिहासिक आधारभूत पातळीपर्यंत पोहोचली नाही आणि समुद्री कासवांना हवामान बदलामुळे वाढत्या धोक्यांचा सामना करावा लागतो जे कि थेट मानवी प्रभावांपेक्षा कमी करणे अधिक कठीण आहे. मासेमारी करणारे समुदाय आणि समुद्री कासवे यांना वेगाने बदलणाऱ्या या ग्रहाच्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने, पिढ्यानपिढ्या मिळवलेले ज्ञान भविष्यातील अभ्यासक्रमांची आखणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

मूळ इंग्रजी लेखिका – मिशेल मारिया अर्ली कॅपिस्ट्रान

अनुवादक – राघवेंद्र वंजारी 

चित्रे – अथुल्या पिल्लई 

This article is from issue

16.2

2022 Jun